Pune Mayor : मोठी बातमी! पुण्याचा कारभारी ‘या’ दिवशी ठरणार; भाजप धक्कातंत्र देणार की…
Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौर पदावरून मोठी रस्सीखेच होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार की चर्चेतल्याच नावाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Pune Mayor : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडीला विलंब होताना दिसत आहे. याची अनेक कारणं सांगितली जात आहेत. मुंबईनंतर आता पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे.
सत्तास्थापनेचा तिढा कायम असून पुण्याचा कारभारी कोण होणार यासाठी मोठी चुरस रंगल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील महिन्यात ६ फेब्रुवारीला पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता या सभेला सुरुवात केली जाणार असून, महापौर आणि उपमहापौरपदाची निवड केली होणार आहे.
पुणे महापालिकेवर १६५ जागांपैकी ११९ भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचाच महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे स्पष्ट आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे.

पुणे महाननगर पालिका
त्यामुळे दोन महत्वाच्या पदांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. पुण्यात यंदा महिला राज असणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे पद आरक्षित करण्यात आले आहे.
या नावांची महापौर पदासाठी चर्चा
रंजना टिळेकर : प्रभाग क्रमांक 40 (कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी) मधून निवडून आलेल्या रंजना टिळेकर यांनी शिवसेना (यूबीटी) नेते वसंत मोरे यांचे पुत्र रूपेश मोरे यांचा पराभव केला आहे.
रोहिणी चिमटे: प्रभाग क्रमांक 29 (खराडी-मांजरी बुद्रुक) मधून निवडून आलेल्या आहेत.
मंजुषा नागपुरे : सिंहगड परिसरात मजबूत जनसंपर्क असलेल्या अनुभवी नेत्या आणि माजी नगरसेवक राहिलेल्या आहेत. त्या माणिकबाग-सनसिटी वॉर्डमधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
प्राची आल्हाट : वॉर्ड क्रमांक 41 (मोहम्मदवाडी-कौसरबाग) मधून निवडून आल्या आहेत.
वीणा घोष : प्रभाग क्रमांक 36 (धायरी-नर्हे) मधून निवडून आलेल्या वीणा घोष यांच्या नावाची चर्चा आहे.
मृणाल कांबळे : वॉर्ड क्रमांक 22 (काशेवाडी-डायस प्लॉट) मधून निवडून आल्या असून त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश बागवे यांच्या सून इंदिरा बागवे यांचा पराभव केला आहे.
वर्षा तापकीर : धनकवडी वॉर्ड क्रमांक 37 ब (कात्रज डेअरी परिसर) मधून निवडून आल्या आहेत.
मानसी मनोज देशपांडे : शंकर महाराज मठ बिबवेवाडीतील वॉर्ड क्रमांक 20 क मधून निवडून आलेल्या मानसी मनोज देशपांडे, ज्या मंत्री माधुरी मिसाळ यांच्या नंनद आहेत.
या नावांशिवाय भाजप धक्कातंत्राचा वापर करून चर्चेत नसलेल्या नावाला देखील संधी देऊ शकतो.
हेही वाचा : Iron Deficiency : महिलांच्या या रोजच्या चुकांमुळे वाढतोय एनीमियाचा धोका, वेळीच सावध व्हा





