Ashok Chaudhary on Bihar Bhawan : “कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू, राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का?”
Ashok Chaudhary on Bihar Bhawan | "राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का? कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू," बिहार सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा

Ashok Chaudhary on Bihar Bhawan | मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या निर्णयाला मनसेकडून जोरदार विरोध केला जात आहे. मात्र याचदरम्यान आता बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी, “आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू. बिहार भवन बांधण्याचे काम थांबवण्याएवढी ताकद कोणामध्येही नाही”, अशा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी राज्यांमध्ये बांधणार; चौधरींचा इशारा
“राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजा आहेत का? फालतू गोष्टी सुरु आहेत. उपचारांसाठी महाराष्ट्रात जाणाऱ्यांसाठी ते बांधले जात आहे. हा देश आहे की कुणाची जबरदस्ती चालणार आहे. नाही बनू देणार म्हणतात. आणखी राज्यांमध्ये बांधणार आहेत. बिहार भवन राज्यातील जनतेसाठी असंख्य सुविधा प्रदान करेल. हे कोणत्याही राजकीय अजेंडाचा भाग म्हणून नाही तर मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून बांधले जात आहे,” असे अशोक चौधरी म्हणाले.
तर शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम म्हणाले, “मनसेने विरोध करणे चुकीचे आहे. ही इमारत कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. याला विरोध करणारे, विशेषतः मनसे, यात काय भूमिका बजावतात? हा प्रकल्प मानवतेबद्दल आहे आणि त्याचे राजकारण करणे दुर्दैवी आहे,” असं संजय निरुपम म्हणाले.
मुंबईत उभारले जाणारे बिहार भवन कसे असणार?
मुंबईतील पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारलं जाणार आहे, बिहार सरकारनं याबाबत घोषणा करत प्रशासकीय खर्चाला मान्यता देखील दिली आहे. मुंबईमध्ये जे बिहार भवन उभारलं जाणार आहे, त्यासाठी बिहार सरकारने 314 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. Ashok Chaudhary on Bihar Bhawan |
हे प्रस्तावित बिहार भवन 30 मजली असणार आहे. या बिहार भवनात एकूण 178 खोल्या असणार आहेत. यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2752.77 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या बिहार भवनात सरकारी अधिकारी पाहुणे आणि गरजू लोकांसाठी सोय करण्यात येणार आहे. Ashok Chaudhary on Bihar Bhawan |
Keerthy Suresh: कीर्ती सुरेशचा ‘डबिंग मॅरेथॉन’; सलग ९ तास काम, फोटो शेअर करत सांगितला अनुभव
येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी 72 आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे. यात मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय केली जाणार आहे. Ashok Chaudhary on Bihar Bhawan |
बिहार भवनाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारमधील गंभीर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी विशेष राहण्याची व्यवस्था असेल. Ashok Chaudhary on Bihar Bhawan |
हेही वाचा :
Keerthy Suresh: कीर्ती सुरेशचा ‘डबिंग मॅरेथॉन’; सलग ९ तास काम, फोटो शेअर करत सांगितला अनुभव






