मोठी बातमी ! शिंदे-भाजप सरकारमध्ये अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल सामील

मुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर आताच्या घडीची मोठी बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील सजीत पवार यांना साथ दिली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना साथ देत शिंदे-भाजप गटात ते सामील झाले असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. दरम्यान,आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता.
अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असे अजित पवार म्हणाले.





