बारामतीमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांच्या धाकट्या सुपुत्राची राजकारणात एन्ट्री?

Jai Pawar : सध्या बारामतीचे राजकारण चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती तालुकाध्यपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे संदीप कृष्णराव बांदल यांची तालुकाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येणार असल्याचे संकेत यामुळे मिळत आहेत. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
बारामती नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून उपमुख्यमंत्री अजित यांचे धाकटे सुपुत्र जय पवारांना राजकारणात एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिलेले आहेत. यामुळे निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी केली जात असून, येत्या काही दिवसांत निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहिता कधी लागणार याबाबत माहिती येवू शकते.
हेही वाचा : “नावापुरतेच शहबाज सरकार अस्तित्वात, खरे नियंत्रण लष्कराकडेच” ; तालिबानकडून पाकिस्तानचा पर्दाफाश
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. बारामती नगरपरिषदेचे नगराध्यपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने यासाठी अनेक इच्छुक नावे समोर येत असताना आता थेट अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे मोठा संघर्ष निर्माण होऊ शकते. या संघर्षाला अटकाव घालण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जय पवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नवीन प्रभाग रचनेनुसार बारामती नगरपरिषदेसाठी ४१ नगरसेवक निवडून जाणार असून, नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचे नाव पुढे आल्यास बारामतीच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड ठरली जाणार आहे. यामुळे आता अजित पवार लवकरच धक्कातंत्र देणार असल्याची जोरदार चर्चा बारामतीच्या स्थानिक राजकारणात सुरू झाली आहे.





