Keshav Prasad Maurya : मोठा अनर्थ टळला! उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग
Keshav Prasad Maurya : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॅाप्टरचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले आहे.

Keshav Prasad Maurya : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ( Keshav Prasad Maurya ) यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले आहे. त्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये धुराचे लोट पसरले. पायलटने प्रसंगावधान दाखवत तात्काळ लखनौ विमानतळावर हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आहे.
नेमकं काय घडलं? Keshav Prasad Maurya
शनिवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेलिकॉप्टरमध्ये बसले. उड्डाणानंतर काही सेकंदातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे हवेत धुराचे लोट पसरले. पायलटने तात्काळ विमानतळावर हेलिकॅाप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. उपमुख्यमंत्री मौर्य आज शनिवार सकाळी ११:३० च्या सुमारास कौशांबी येथे येणार होते, जिथे ते पक्षाचे अधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार होते.

Keshav Prasad Maurya
तसेच विविध विकास प्रकल्पांची पाहणी करणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग करण्यात आल्याने ते या कार्यक्रमांना जाऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच हेलिकॅाप्टरमध्ये नेमका कोणता बिघाड झाला होता. याची माहिती घेतली जात आहे.





