Gurmeet Ram Rahim Singh : बाबा गुरमीत राम रहीम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग यांची एका हत्या प्रकरणात निर्देाष मुक्तता केली आहे. शनिवारी याबाबतचा निर्णय न्यायालयाने जारी केला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तर इतर तीन आरोपी कुलदीप सिंह, निर्मल सिंह, कृश्ण लाल यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. नेमकं प्रकरण काय? Gurmeet Ram Rahim Singh हे प्रकरण २००२ मधील असून, पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हरियाणातील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या प्रकाशनात डेरा सच्चा सौदा मुख्यालयात महिला अनुयायांचे शौषण होता असल्याचा आरोप एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला होता. यानंतर रामचंद्र यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीम यांना दोषी ठरवून जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. सात वर्षं तरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्यांना निर्देाष मुक्त करण्यात आले आहे. १०१९ मध्ये सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुमीत राम रहीम यांच्यासह कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्ण लाल या तिघांना दोषी ठरवले होते. या निकालावर राम रहीम यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. Gurmeet Ram Rahim Singh गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim Singh) यांना २०१७ मध्ये त्यांच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. यामुळे हत्या प्रकरणात निर्देाष मुक्त करण्यात आले असले तरी, यौन शोषणाच्या आरोप असल्याने त्यांना अजुनही तुरुंगातच राहावे लागणार आहे. हेही वाचा : Amol Mitkari : आता हे पुन्हा बघायला मिळणार नाही! मिटकरींचं विचार करायला भाग पाडणार ट्वीट; ‘तो’ फोटो केला शेअर