“बाबासाहेबांचे नाव घेऊन ज्ञान देऊ नका..” ; मायावतींच्या घोषणेवर केशव प्रसाद मौर्य संतापले ; दिला ‘हा’ सल्ला

keshav Prasad Maurya । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सुरु झालेले राजकारण काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बसपा सुप्रीमो मायावती यांनी नुकतेच याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसही भाजपवर हल्लाबोल करत आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. त्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वक्तव्य केले आहे. “या पक्षांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही.” असे म्हणत त्यांनी बसपप्रमुख मायावती यांच्यावर निशाणा साधला.
अशा आंदोलनाची गरज नाही keshav Prasad Maurya ।
बसपाच्या निषेधावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “ज्या मुद्द्यावर काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष आंदोलन करत आहेत, अशा आंदोलनाची गरज नाही. जेव्हापासून केंद्रात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली आहे. नरेंद्र मोदी सरकारपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांपर्यंत, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा इतर राष्ट्रीय नेते, सर्वजण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे पूजक आहेत.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
‘बाबा साहेबांचे नाव घेऊन ज्ञान देऊ नका’ keshav Prasad Maurya ।
पुढे केशव मौर्य म्हणाले की, “भाजप गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. आमच्या सरकारने 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे.” तसेच “मी मायावतींना सांगू इच्छितो की, त्यांनी आपला पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि समाजवादी पक्षाने स्वतःला नष्ट होण्यापासून वाचवावे आणि काँग्रेसने आपला पक्ष भारतमुक्त होण्यापासून वाचवावा. बाबा साहेबांबद्दल ज्ञान देऊ नये. “हे सर्व बाबासाहेबांचे जन्म, जातीविरोधी आहेत.”असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत विधान केले होते, ज्यात त्यांनी, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे, जर विरोधी पक्षांनी एवढ्या वेळा देवाचे नाव इतके घेतले असते. तर त्यांना सात जन्म स्वर्ग मिळाला असता.” त्यांच्या वक्तव्याचा हा छोटासा भाग काढून विरोधी पक्ष भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या भाषणाचा छोटासा भाग काढून चुकीच्या पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.





