राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ! येत्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देणार

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहणार असल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, ही राष्ट्रवादीची ठाम भूमिका – जयंत पाटील
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषद व 4 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.





