OBC Morcha : गणेशोत्सवा दरम्यान मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी राजधानी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला. त्यानुसार ते आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले. राज्यभरातून त्यांना समर्थन देण्यासाठी मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळित झालं होतं. राज्य शासनाने तीन ते चार दिवसांनी मराठा समाजासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण थांबवले. मात्र, शासनाने मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. काल ओबीसी समाजाच्या उपसमितीची बैठक पार पडली. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील राजधानी मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार असल्याची माहिती मिळत आहे. दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात ओबीसी समाजातील विविध संघटनांच्या नेत्यांची अॅानलाइन बैठक झाली असून यामध्ये मोर्चाची अंतिम तारीख निश्चित करण्यात येणार आहे. यामुळे जर ओबीसी समाजाने मुंबईत महामोर्चा मुंबईत काढल्यास सरकारची पुन्हा एकदा कोंडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण काय? राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयात कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दसऱ्यानंतर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हेही वाचा : दिल्लीपासून मुंबई-रांचीपर्यंत विशेष सेलचे छापे ; ५ आयएस दहशतवाद्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त