छगन भुजबळांच्या त्या विधानानंतर मनोज जरांगेंचा इशारा म्हणाले “जितका त्रास मराठ्यांना दिला…”

Manoj Jarange : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्यावर संघर्ष होताना दिसत आहे. ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे ठाम आहेत. आता त्यांनी दिल्लीत जाण्याचे सूतोवाच केले आहेत. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील गरज पडली तर दिल्लीत जाणार असल्याचं नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला होता.
भुजबळांनी मनोज जरांगे यांना जे समर्थन करतात त्यांच्या जवळ जातात त्यांना ओबीसींनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे, असं विधान केलं होतं. तसेच त्यांनी मराठा जीआरविरोधात मोठी भूमिका घेतली आहे. भुजबळांनी न्यायलयीन लढाईसह रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं म्हटलं होतं. यावर मराठा समाजेचे नेते मनोज जरांगे यांनी भुजबळांना काय करायचं ते करुद्यात, त्याची काही अडचण नाही, असं प्रत्यत्तर दिलं आहे.
जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसती, असं म्हणत मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याता उत्तर देणार असं मनोज जरागेंनी ठणकावून सांगितलं.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
नुकताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. मंत्री छगन भुजबळ हे देखील नागपूरात आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ओबीसींच्या मोर्चाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सुरूवातीला महाराष्ट्रातील अनेक भागात मोर्चा काढणार असून त्यानंतर गरज पडली तर मुंबई आणि मग दिल्लीला जाणार असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. तसेच भुजबळांनी मनोज जरांगे यांना जे समर्थन करतात त्यांच्या जवळ जातात त्यांना ओबीसींनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे, असं विधान केलं होतं.
हेही वाचा : लाडक्या बहिणींनो E-KYC कशी कराल? कोणती कागदपत्रे लागणार? २ महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा; कसे ते जाणून घ्या…





