अनन्याच्या हातून जाणार बिग बजेट चित्रपट?

ड्रग्ज प्रकरणात 26 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. आर्यन खानला जरी दिलासा मिळाला असला तरी व्हॉट्सऍप चॅटमुळे या प्रकरणात नाव आलेल्या अनन्या पांडेच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत. तिच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात नाव आल्याने अनन्या पांडेच्या हातून अनेक चांगल्या ऑफर्स निसटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनन्याकडे सध्या लॅकमे, ओन्ली, जिलेट, पर्क चॉकलेट या ब्रॅंडच्या जाहिराती आहेत. मात्र, आता ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने लोकांनी जर या प्रोडक्ट्सवर बहिष्कार घालायचे ठरवले तर कंपनीचे फार मोठे नुकसान होणार आहे.
त्यामुळे आता हे सर्व ब्रॅंड हे त्यांचे नुकसान स्वीकारणार नाहीत. यामुळेच अर्थात अनन्याकडून या ब्रॅंड्सची जाहिरात जाऊ शकते. सध्या अनन्याकडे “लायगर’ हा बिग बजेट सिनेमा आहे. या चित्रपटाचं बजेट 125 कोटी आहे.
शिवाय या चित्रपटात ती साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. तिच्या करिअरसाठी हा चित्रपट खूप फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे हा चित्रपट जर अनन्याला सोडावा लागला तर अनन्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.





