BREAKING : वीज संकट टळले! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी; महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

Updated On:

MSEB strike called off –  महावितरण, महाजनको आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महावितरणचे खासगीकरण करणार नाही असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. 32 संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती.

माजी मंत्री अनिल परब यांना ईडीचा दणका; 10 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई

“राज्य सरकारला या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. उलट पुढच्या तीन वर्षांत या तीनही कंपन्यांमध्ये 50 हजारांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही.”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.

Bank scams : सुब्रमण्यम स्वामींच्या ‘त्या’ याचिकेला आरबीआयचा विरोध

समांतर खासगी परवाने देण्याबद्दल अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, संमातर परवाने पद्धतीला विरोध करण्याची कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली. याबद्दल कर्मचाऱ्यांची समजूत घालताना ते म्हणाले की, हे नोटीफिकेशन खासगी कंपनीने काढले आहे. जेव्हा एमआरसी यावर नोटीफिकेशन काढेल त्यात आपण सरकारची सर्व बाजू मांडू.” असं त्यांनी सांगितलं.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

2026-08-23 16:11:36

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरमध्ये Gen-Zसोबत संवाद; तरुणाईच्या प्रश्नांना दिले उत्तर

2026-08-23 14:46:46

Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरमध्ये Gen-Zसोबत संवाद; तरुणाईच्या प्रश्नांना दिले उत्तर

Sanjay Raut : "जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती?"; संजय राऊतांचा फडणविसांना सवाल

2026-08-23 13:10:46

Sanjay Raut : "जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती?"; संजय राऊतांचा फडणविसांना सवाल

Sugar Price Hike : "...दारुचे भाव 10 पटीने वाढवा"; साखर दरवाढीवरुन माजी मंत्र्यांचा फडणविसांना अजब सल्ला

2026-08-23 09:32:56

Sugar Price Hike : "...दारुचे भाव 10 पटीने वाढवा"; साखर दरवाढीवरुन माजी मंत्र्यांचा फडणविसांना अजब सल्ला

Devendra Fadanvis : शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प राबवणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

2026-08-22 19:20:09

Devendra Fadanvis : शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प राबवणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती