Big Breaking News : उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे की, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”.
दरम्यान, 22 जून रोजी राज्यपाल कोश्यारी यांचा कोविड -19 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना केवळ खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांनंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला . त्यानंतर रविवारी(26 जून) राजभवन येथे आगमन झाले. याबदल त्यांनी ट्विटव्दारे माहिती देत म्हटले होतं की, “आज चार दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे याद्वारे मनःपूर्वक आभार मानतो”.





