Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का; विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण
Maharashtra Politics : उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : उत्तर मुंबईतील राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाची मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर यांच्यासह शाने आलम खान, भरत चोपडे, विधानसभा समन्वयक अभिषेक चव्हाण, उपशाखा प्रमुख आनंद कातुर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. यावेळी ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या संघटनात्मक हालचालींना चालना मिळाल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. (Maharashtra Politics)
‘एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास’
यावेळी बोलताना सिद्धेश कदम यांनी सांगितले की, मुंबई उपनगरातील अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याचे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
काही कार्यकर्त्यांना त्यांच्या आधीच्या पक्षात अपेक्षित राजकीय संधी किंवा मदत मिळत नसल्याचा दावा कदम यांनी केला. युवा पिढीला राजकीय संधी देण्याचे काम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
दिशा सालियन प्रकरणावरही सिद्धेश कदमांचे भाष्य
दरम्यान, सिद्धेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणाच्या तपासातून वस्तुस्थिती समोर येईल आणि सीबीआय चौकशीत सत्य स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. दिशा सालियन यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या प्रकरणासंदर्भातील नोटीसबाबत बोलताना, मुलीला न्याय मिळावा यासाठी संबंधित व्यक्तीला कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा अधिकार असल्याचे कदम यांनी म्हटले. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. (Maharashtra Politics)
उत्तर मुंबईतील या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी..! शिवसेनेच्या शाखेतच शाखाप्रमुखाला बांबूने मारहाण; राज्यात खळबळ
Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदार पुत्राला अटक; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ





