Maharashtra Weather : राज्यात पावसाचे होणार पुनरागमन; हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भाग अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली, तर काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच बंगालच्या उपसागरात हवामानातील बदलामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन होत आहे. येत्या २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. (Maharashtra Weather)
यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार असून, अंतर्गत भागातही पावसाचा जोर वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी ताशी 30-40 किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस/मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस, ताशी 40-50 किमी वेगाचे वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस/मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
दरम्यान, 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहेत. हा मान्सूनच्या हंगामाचा शेवटचा टप्पा असून, या पावसामुळे कोरड्या हवामानातून दिलासा मिळू शकतो. (Maharashtra Weather)
Maharashtra Rain Update : मॉन्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज






