भाजपला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला आपल्या आपल्या पदाचा राजीनामा

लातूर : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या दरम्यान भाजपची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपला उदगीर मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपसाठी हा दुसरा धक्का आहे. याअगोदर माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपची साथ सोडत हाती तुतारी घेतली होती.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदगीर मतदार संघात भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी हातात तुतारी घेतल्यानंतर आता उदगीर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी देखील भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
अजित पवारांना मोठा धक्का
शनिवारी महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला होता.पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.





