Bhuvneshwar Kumar Reaction : ‘मैदान कितीही लहान असो, चेंडू आमच्याच हातात असतो!’ धावांचा पाऊस पडल्यानंतर भुवनेश्वर कुमारचे रोखठोक उत्तर
Bhuvneshwar Kumar Reaction : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार फलंदाजांचे क्रिकेटवरील वर्चस्व पाहून नाराज आहे. मात्र, त्याला आपल्या गोलंदाजीवर विश्वास असून तो सामन्यावर नियंत्रण मिळवू शकतो.

Bhuvneshwar Kumar on T20 Cricket Evolution and Bowlers Challenge : आधुनिक आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांचे वर्चस्व कमालीचे वाढले असले, तरी एक चतुर गोलंदाज आजही सामन्याचे भवितव्य ठरवू शकतो, असा ठाम विश्वास भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केला आहे. जवळपास चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ३६ वर्षीय भुवीने स्पष्ट केले की, फलंदाजांसाठी अनुकूल नियम आणि खेळपट्ट्यांमुळे गोलंदाजांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत; परंतु योग्य नियोजन आणि परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन गोलंदाज आजही फलंदाजांना रोखू शकतात. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
चुकीसाठी जागा नाही, पण रणनीती महत्त्वाची: भुवी
न्यूझीलंडविरुद्धच्या चालू टी-२० मालिकेत भुवनेश्वरला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही; त्याने तीन सामन्यांत केवळ एक विकेट्स घेत प्रत्येक सामन्यात ४० हून अधिक धावा खर्च केल्या आहेत. तिसऱ्या सामन्यातही त्याने ४ षटकांत ४० धावा दिल्या. तरीही सकारात्मक दृष्टिकोन मांडत भुवी म्हणाला, “सध्याच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी चुकांना फार कमी वाव उरला आहे. लहान मैदाने आणि फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे कठीण आहे; मात्र गोलंदाज आपल्या हुशारीने योग्य टप्प्यावर चेंडू टाकून सामन्याचा रोख बदलू शकतो.”
‘मैदान कितीही लहान असले तरी चेंडू गोलंदाजाच्याच हातात असतो’
Bhuvneshwar Kumar Press Conference | India vs New Zealand 3rd T20I https://t.co/west6JeX9X
— Shashank (@Shashank16Feb) October 27, 2026
आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना भुवनेश्वरने सांगितले की, मैदान कितीही लहान असो किंवा परिस्थिती फलंदाजांच्या बाजूने असो, चेंडू टाकणारा गोलंदाजच असतो. त्यानंतर त्या चेंडूवर फटका कसा मारायचा हे फलंदाजावर अवलंबून असते. आजचे अव्वल गोलंदाज आयपीएलपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत स्वतःच्या गोलंदाजीत वेगाने बदल करत आहेत आणि स्वतःला परिस्थितीनुसार यशस्वीरीत्या जुळवून घेत आहेत.
२०१२ मधील पदार्पण आणि आताच्या क्रिकेटमधील फरक –
A brilliant start team India Pacers, Bhuvneshwar Kumar, Prince Yadav & Arshdeep Singh.
– Tim Seifert, Daryl Mitchell & Finn Allen back to hut, India Vs New Zealand in 2nd T20I.
Look at Vaibhav Sooryavanshi reaction after Tilak Varma’s takes Catch.😭 https://t.co/OgbwQar9cU
— MANU (@IMManu_14) October 24, 2026
आपल्या कारकिर्दीची तुलना करताना भुवनेश्वरने नमूद केले की, त्याने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या काळातील आणि आजच्या आधुनिक टी-२० क्रिकेटमध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडला असून आता हा प्रकार गोलंदाजांसाठी कमालीचा आव्हानात्मक झाला आहे. बदलत्या क्रिकेट तंत्रासोबत गोलंदाजांना अधिक मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे लागत असल्याचे त्याने मान्य केले.
एकदिवसीय पुनरागमनावर विचार नाही; देशांतर्गत क्रिकेटवर भर –
भविष्यातील योजना आणि एकदिवसीय क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी विचारले असता, भुवीने आपण खूप पुढचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले. भारतासाठी पुन्हा एकदा खेळायला मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे; मात्र सध्या आपण खूप लांबचा विचार न करता केवळ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत, असे सांगत त्याने सध्यातरी वर्तमानात जगण्याचा निर्धार व्यक्त केला.





