बीएचआर” आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अखेर अटक

पुणे – भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. सोमवारी पुणे पोलिसांच्या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून जितेंद्र कांडरे यास बेड्या ठोकल्या. कांडरेच्या अटकेमुळे मोठे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.
“बीएचआर” आर्थिक घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मागील काही महिन्यापासून राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाडून 17 जून रोजी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर धडक कारवाई करीत भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भूसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोहार (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रमोद किसनराव कापसे (अकोला),प्रेम नारायण कागोटा (पुणे) अशा 13 जणाना अटक केली होती.त्यामध्ये जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापतीसह, जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे याचा समावेश होता.





