Bhosari Crime : भोसरीत कोयत्याचा थरार! जुन्या वादातून तरुणावर हल्ला, दोन अटक तर दोन फरार

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत कोयत्याने वार करण्यात आले. हि घटना गुरुवारी (दि. २३) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भोसरीतील राणतारा कॉलनी परिसरात घडली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.अक्षय गोडसे (वय ३०) आणि सोन्या गुप्ता य गोडसे (वय १८, दोघेही रा. राणतारा कॉलनी, सद्गुरुनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच कुण्या आणि रोहन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरसिंह विजय रसाळ (वय २३, रा. मोहननगर, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि. २४) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्याचे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





