पुणे जिल्हा | शेलपिंपळगावात रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – मोहितेवाडी चिंचोशी रोड ते खैसोबा मंदिर तसेच शेलपिंपळगाव पोस्ट ऑफिस ते अंगणवाडी क्र 2 पर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निधीतून व शेलपिंपळगावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून हे काँक्रिटीकरण करण्यात आले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते, शेलपिंपळगाव लोकनियुक्त सरपंच शरदराव मोहिते पाटील,
उपसरपंच प्रियंका मोहिते, माजी उपसरपंच पूजा दौंडकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल पोतले, भाऊसाहेब दौंडकर, गणेश मोहिते, सुधीर गायकवाड, निलम पोतले, प्रिया मोहिते, बायडाबाई दौंडकर, आरती पोतले, अभिषेक दौंडकर, सोमनाथ थोरवे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले.
याप्रसंगी मोहितेवाडी सोसायटीच्या उपाध्यक्ष रखमाबाई बाजीराव मोहिते, शेलपिंपळगाव सोसायटीचे उपाध्यक्ष गणपत दौंडकर, विलास मोहिते, हनुमंत मोहिते, सोसायटी संचालक अशोक मोहिते, भाऊसाहेब मोहिते, बाळासाहेब पोतले, तज्ज्ञ संचालक वस्तादशेठ पोतले, हिरामण पोतले, अविनाश मोहिते,
यात्रा कमिटी सदस्य किसन मोहिते, सत्यवान मोहिते, रवींद्र मोहिते, संजय मोहिते, नितीन मोहिते, बबन मोहिते, पांडुरंग मोहिते, राजुशेठ मोहिते, सदाशिव लोखंडे, ग्रामसेवक शंकरराव ढोरे, युवा नेते दिगंबर मोहिते, बाजीराव मोहिते, ठेकेदार अमित मोहिते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.





