‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद येणार पुण्यात

पुणे – भीम आर्मी या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक, नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण येत्या 26 जून रोजी पुण्यात येणार असल्याचे भीम आर्मी चे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी कळविले आहे .मागील वर्षीही आझाद हे पुणे दौऱ्यावर आले होते.
चंद्रशेखर आझाद 26 जून रोजी सकाळी 10 वाजता लोहगाव विमातळावर आगमन होईल. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जाऊन राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत .या वेळी पुण्यातील प्रमुख कार्यकर्ते बरोबर असणार आहेत.अभिवादन कार्यक्रमानंतर पुणे शहरातील पदाधिकारी यांच्या बरोबर शहर मेळावा व महत्त्वपूर्ण बैठीकीचे आयोजन करण्यात आले आहे .
या बैठकीत अनुसूचित जाती जमातीच्या विविध प्रश्नांवर व महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. या वेळी पुणे शहरातील विविध पक्ष, संघटनाचे प्रमुख पदाधिकारी भीम आर्मी संघटनेत आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याचे भीम आर्मी पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे .





