भाई जानने घेतली मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट; भेटी मागचं कारण काय? वाचा…

नवी दिल्ली – बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत होता. विशेष म्हणजे सलमान खान याच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई ही केली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आला आहे आणि याच कारण देखील तितकंच खास आहे.
नुकतंच अभिनेता सलमान खान याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट आहे. स्वतः सलमान खान हा ममता बनर्जी यांच्या कार्यलयावर त्यांची भेट घेण्यासाठी पोहचला होता. यावेळी ममता बनर्जी देखील सलमान खान याचे स्वागत करण्यासाठी पोहल्या. कार्यालयाच्या बाहेर येत ममता बनर्जी यांनी शाल देऊन सलमान खान याचे स्वागत केले.
#WATCH | Actor Salman Khan meets West Bengal CM Mamata Banerjee at the latter’s residence in Kolkata pic.twitter.com/ilydxg9Edi
— ANI (@ANI) May 13, 2023
सध्या सोशलवर त्यांच्या भेटीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 13 मेला म्हणजेच आज कोलकातामध्ये एक कॉन्सर्ट परफॉर्म आहे. यासाठी सलमान खान हा कोलकातामध्ये आहे. आणि याच दरम्यान त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट देखील घेतली.





