Ozar News : ओझरमध्ये रंगला साहस, निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम
Ozar News : सहनशक्तीला इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माची साथ देणाऱ्या BERGMAN OZAR PUNE 2026 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा महोत्सवाचा डेक्कन स्पोर्ट्स क्लब व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण समारोप श्री क्षेत्र ओझर येथे झाला.

Ozar News : सहनशक्तीला इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माची साथ देणाऱ्या BERGMAN OZAR PUNE 2026 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा महोत्सवाचा डेक्कन स्पोर्ट्स क्लब व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या सयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण समारोप श्री क्षेत्र ओझर येथे झाला. (Ozar News)
३ व ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत देश-विदेशातील ट्रायथलीट्स तसेच ओपन वॉटर स्विमर्सनी सहभाग घेतला.
ओझर परिसरातील निसर्गरम्य जलाशय, सह्याद्रीचा निसर्ग, ग्रामीण वातावरण, ऐतिहासिक वारसा आणि श्री विघ्नहर गणपती देवस्थानाचे धार्मिक महत्त्व यामुळे या स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले. (Ozar News)
BERGMAN Ozar ही केवळ क्रीडा स्पर्धा न राहता सहभागी खेळाडूंसाठी एक आगळावेगळा स्पोर्ट अनुभव ठरला. ३ ऑक्टोबर रोजी BERGMAN SWIMATHON अंतर्गत ४ किमी, २ किमी, १ किमी ओपन वॉटर स्विम तसेच ५०० मीटर किड्स स्विम अशा विविध स्पर्धा पार पडल्या. (Ozar News)
तर ४ ऑक्टोबर रोजी BERGMAN TRIATHLON मध्ये BERGMAN 102 अंतर्गत २ किमी पोहणे, ८० किमी सायकलिंग आणि २० किमी धावणे, अशा एकूण १०२ किमी अंतराच्या आव्हानात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. (Ozar News)
श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट येथे बक्षीस वितरण
स्पर्धेतील विजेत्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे तसेच विश्वस्त सूर्यकांत रवळे, संतोष कवडे, शिल्पा जगदाळे, विलास कवडे, विनायक मांडे, समीर मांडे, मंगेश पोखरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (Ozar News)
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, मा. अध्यक्ष श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट गणेशभाऊ कवडे, ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिकेत रवळे, उपाध्यक्ष चिंतामण कवडे, ओझर नं. २ गावच्या सरपंच तारामती कर्डक, ओझर नं. १ च्या पोलीस पाटील प्रीती कवडे तसेच ओझर नं. २ चे पोलीस पाटील मोहन कवडे यांची उपस्थिती लाभली. (Ozar News)
मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. (Ozar News)
ओझर परिसरातील पर्यटनाला चालना
“जलाशयात पोहणे, निसर्गातून सायकल चालवणे आणि इतिहासाच्या भूमीत धावणे” या संकल्पनेतून आयोजित BERGMAN OZAR PUNE 2026 मुळे ओझरचे नाव क्रीडा पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित झाले आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धांमुळे ओझर परिसरातील निसर्ग, अध्यात्म, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे. (Ozar News)





