Ozar News : कृष्णराव मुंढे शाळेजवळून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाचा ७२ तासांत शोध; जुन्नर पोलिसांना यश
Ozar News : जुन्नर येथील कृष्णराव मुंढे शाळेच्या गेटजवळील एका हॉटेल परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाचा अवघ्या ७२ तासांत यशस्वी शोध घेण्यात जुन्नर पोलिसांना यश आले आहे.

Ozar News : जुन्नर येथील कृष्णराव मुंढे शाळेच्या गेटजवळील एका हॉटेल परिसरातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाचा ७२ तासांत शोध घेण्यात जुन्नर पोलिसांना यश आले. हा मुलगा ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे नातेवाईकांकडे आढळून आला असून, पोलिसांनी त्याला पालकांच्या ताब्यात दिले आहे. (Ozar News)
याबाबत २३ सप्टेंबर रोजी मनोहर अर्जुन गायकवाड (वय ६५, रा. पिंपरवाडी इंगळून, ता. जुन्नर) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या १२ वर्षीय नातवाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून घेऊन गेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला होता. (Ozar News)
यापूर्वी याच परिसरातून तीन मुले बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे चौथ्या मुलाच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण गांभीर्याने घेत जुन्नर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली. (Ozar News)
तपासादरम्यान पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याचा ठावठिकाणा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलगा दिवा, ठाणे येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. (Ozar News)
प्राथमिक तपासात संबंधित मुलगा नातेवाईकांना भेटण्यासाठी स्वतःहून निघून गेल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू आहे. (Ozar News)
जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस हवालदार मंगेश लांडगे, संदीप भोते, पोलीस शिपाई कैलास केंद्रे, श्रीराम शिंदे, विशाल चौधरी, विनोद पवार आणि शंभू निरडे यांनी तपासात सहभाग घेतला. (Ozar News)
Ozar News : विघ्नहर कारखान्याच्या ४१व्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न




