“९/११ मध्ये अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” ; दोहा हल्ल्यावर नेतन्याहू यांचे मोठे विधान

Benjamin Netanyahu। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच कतारची राजधानी दोहा याठिकाणी झालेल्या लष्करी हल्ल्याचे समर्थन केले. नेतन्याहू यांनी त्याची तुलना ९ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या कारवाईशी केली. हमास नेत्यांमुळे इस्रायलने दोहावर हल्ला केला. कतारने हमास नेत्यांना आश्रय दिला आणि त्यांना आर्थिक मदतही केली” असा आरोप करण्यात आला आहे.
दोहा याठिकाणी इस्रायलने केलेल्या हल्ल्याबद्दल नेतन्याहू यांना टीकेचा सामना करावा लागला. त्यांनी या हल्ल्याची तुलना ओसामा बिन लादेनवर अमेरिकेच्या कारवाईशी केली. नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या त्यानी, “११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने जे केले, तेच आम्हीही केले आहे. आम्ही अमेरिकेप्रमाणेच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.”असे म्हणाले आहेत.
कतार हमास नेत्यांना आश्रय देत आहे का? Benjamin Netanyahu।
कतार आणि हमासमधील संबंधांबद्दल आतापर्यंत अनेक दावे केले गेले आहेत. असे म्हटले जाते की हमास दोहा येथून आपले काम चालवते. अशा परिस्थितीत नेतन्याहू हमासला पूर्णपणे नष्ट करू इच्छितात. ते म्हणाले, “जर कतार हमास नेत्यांना वाचवू इच्छित असेल तर त्यांनी त्यांना आश्रय देणे बंद करावे, अन्यथा त्यांचा अंत निश्चित आहे.”
इस्रायलने कधी आणि कुठे हल्ला केला? Benjamin Netanyahu।
मंगळवारी (९ सप्टेंबर) इस्रायलने एक मोठे पाऊल उचलले आणि कतारची राजधानी दोहा येथे हल्ला केला. त्यांनी हवाई हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी हमासची एक मोठी बैठक सुरू असल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अमेरिकेने दिलेल्या सूचनेवर चर्चा करणार होते. अमेरिकेने युद्धबंदीबद्दल बोलले होते.





