Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी कोण जबाबदार? सिद्धरामय्यांच्या सरकारला न्यायालयाने विचारले ‘हे’ १० मोठे प्रश्न

Bengaluru Stampede Karnataka HC Questions Govt on RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय साजरा करण्याची परवानगी कोणी दिली? हा निर्णय कधी आणि कसा घेण्यात आला? आयोजकांनी आवश्यक परवानगी घेतली का? हे प्रश्न आम्ही नाही तर उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला विचारले आहेत. ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात सरकारला या प्रश्नांची उत्तरे १० जूनपर्यंत उच्च न्यायालयात सादर करावी लागतील. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होती.
बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी कोण जबाबदार?
उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० प्रश्नांची सविस्तर उत्तरे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वतःहून दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी.एम. जोशी यांच्या खंडपीठाने गुरुवारी हे प्रश्न विचारले. सरकारला १० जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ४ जून रोजी संध्याकाळी चिन्नास्वामी स्टेडियमसमोर चेंगराचेंगरी झाली, जिथे आरसीबी संघाच्या आयपीएल विजयाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
A sitting judge must investigate the #BengaluruStampede. This is not just negligence, it is criminal.
Why is the Congress high command silent? Where are Rahul Gandhi, KC Venugopal and others who used to rush to Karnataka for every photo opportunity?
Their silence speaks… pic.twitter.com/lyetiwp0CC
— Shobha Karandlaje (@ShobhaBJP) June 7, 2025
कर्नाटकच्या सरकारला न्यायालयाने विचारले १० प्रश्न :
- विजय परेड आयोजित करण्याचा निर्णय कोणत्या पातळीवर आणि कोणी घेतला?
- ही परेड आयोजित करण्याचा निर्णय कधी आणि कोणत्या प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आला?
- या परेडसाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ परवानगी घेण्यात आली होती का?
- या कार्यक्रमाबाबत कोणत्याही प्रकारची मानक कार्यप्रणाली (SOP) आगाऊ जारी करण्यात आली होती का?
- वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली?
- गर्दी नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणती विशेष व्यवस्था केली?
- परेड स्थळी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था काय होती?
- या कार्यक्रमात किती गर्दी जमेल याचा अंदाज सरकारने घेतला होता का?
- अपघातानंतर जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यात आली का?
- जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी किती वेळ लागला आणि कोणती प्रक्रिया रावण्यात आली?
हेही वाचा – Ricky Ponting : बुमराह नाही, गिलच का सर्वोत्तम कसोटी कर्णधार? रिकी पॉन्टिंगने सांगितले कारण
राजकीय आणि अधिकृत सूत्रांनुसार, या कठीण प्रश्नांमुळे आणि न्यायालयीन चौकशीमुळे राज्य सरकारने बंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वरिष्ठ मंत्री, कायदेशीर सल्लागार ए.एस. पोन्नन्ना आणि महाधिवक्ता के.एम. शशिकिरण शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे निलंबन करण्यात आल्याचे वृत्त आहे.





