IND vs ENG : बेन स्टोक्सने ठोकले ऐतिहासिक शतक, इंग्लंडसाठी असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार

IND vs ENG Ben Stokes Century : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मँचेस्टर कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने शतक झळकावताच एक खास कामगिरी केली आहे. तो एका सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिला कर्णधार बनला आहे. क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडसाठी असे करणारा तो १४८ वर्षांमध्ये पहिला कर्णधार बनला आहे.
बेन स्टोक्सने रचला इतिहास –
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्यांदा २४ षटकांत ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने शतकी खेळी खेळली. या कसोटी सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेऊन त्याने इतिहास रचला. १४८ वर्षांमध्ये एकाच कसोटी सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणारा तो पहिला इंग्लंडचा कर्णधार आहे. बेन स्टोक्सला भारताविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर मालिकेत पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नव्हती.
🚨 :
-First 5 Wicket haul with the ball.
– Now Hundred with the bat.-CAPTAIN BEN STOKES LEADS FROM THE FRONT FOR ENGLAND
– AFTER 43 YEARS IN TEST INNINGS WITH 💯 century and fifer haul.
– WHAT A LEADER. 🫡#BenStokes #ENGvIND pic.twitter.com/FTjyuESEAO— Kholinati!on_👑🚩 (@cryptoHolder09) July 26, 2025
त्याला अनेकदा चांगली सुरुवात मिळाली, पण एकदाही तो अर्धशतकापर्यंत पोहोचू शकला नाही. सहा डावांमध्ये तो चार वेळा ३० धावांपेक्षा जास्त धावा करू शकला. पण मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर स्टोक्सने अखेर शतक झळकावले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुखापतीमुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते, तरीही चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने शतक पूर्ण केले.
हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! इंग्लंडमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज
दोन वर्षांनंतर स्टोक्सचे कसोटी शतक –
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे हे कसोटीतील १४वे शतक आहे. दोन वर्षांनंतर त्याने शतकी खेळी केली. त्याने १६४ चेंडूंवर ९ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. याआधी त्याने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर शतकी खेळा साकारली होती. भारताविरुद्धचे हे त्याचे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भारत दौऱ्यावर राजकोट येथे त्याने १२८ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटची कमाल! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत रचला इतिहास
कर्णधार म्हणून २००० धावा पूर्ण –
कर्णधार म्हणून बेन स्टोक्सने कसोटीत २००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा त्याचा कर्णधार म्हणून ३७वा कसोटी सामना आहे. इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये २००० धावा करणारा तो ११वा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा इंग्लिश खेळाडू जो रूट आहे. रूटने ६४ कसोटी सामन्यांच्या ११८ डावांमध्ये ५२९५ धावा केल्या आहेत. ४८४४ धावांसह अॅलिस्टर कूक दुसऱ्या स्थानावर आहे.





