Ben Stokes : ‘कारकीर्दीतील सर्वात कठीण काळ!’, स्टोक्सची कबुली; बेन डकेटच्या मद्यधुंद व्हिडीओने पेटला वाद

मैदानावरील पराभव आणि मैदानाबाहेरील वाद –
मालिकेतील पराभवाच्या हॅट्ट्रिकमुळे कर्णधार बेन स्टोक्सची डोकेदुखी वाढलेली असतानाच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने नवा वाद ओढवून घेतला आहे. या व्हिडीओमध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी दरम्यान संघ नूसा येथे गेला असताना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने’ (ECB) या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.
‘पळ काढणार नाही, तर सामना करणार’ –
He’s chattin’ up the girls with those blonde locks.
Jacob Bethell’s locked in.
Yehhhhhh boyyyyyy 😂😂😂Meanwhile, Duckett’s gettin’ batting lessons from the locals as he just keeps fishin’ outside off 😂😂😂#Ashes #BenDuckett #Noosa #Bazball pic.twitter.com/NJL5Ql8k0S
— Charlie (@Shanks63331148) December 23, 2025
चौथ्या कसोटीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्टोक्स म्हणाला, “इंग्लंडचा कर्णधार म्हणून सध्या मी अनुभवत असलेला हा काळ कदाचित माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात कठीण आहे. मात्र, मी या परिस्थितीपासून पळ काढणार नाही. या दौऱ्याच्या उर्वरित काळातही खंबीरपणे नेतृत्व करत खेळाडूंना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यावर माझा भर असेल.”
टीकाकारांकडून सहानुभूतीची अपेक्षा –
What is this behaviour from Ben Duckett😭😭. He was completely out of his mind after drinking a lot. Disappointing Attitude. We need to be serious. pic.twitter.com/KVsCbv73jX
— Aryan Goel (@Aryan42832Goel) December 23, 2025
सततचा प्रवास आणि घरापासून दूर राहून येणारा मानसिक ताण यावर स्टोक्सने भाष्य केले. तो म्हणाला की, जेव्हा तुमची कामगिरी खराब असते, तेव्हा लोकांकडून होणारी तपासणी अधिक तीव्र होते. अशा वेळी लोकांनी थोडी सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे. बेन डकेटच्या प्रकरणावर बोलताना त्याने स्पष्ट केले की, डकेटला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.
जिंकत असताना सगळं काही छान असतं – स्टोक्स
Ben stokes in ashes ⚱️
Perth: SHELLSHOCKED 🤯Gabba, Brisbane: Weak men 😵
.N
.O
.O
.S
.A
Adelaide: Confused, BlokeBall 😕MCG: Ben Duckett and Jacob bethell Noosa gate
More to come 😄 😄 #Ashes #Ashes2025 #BenDuckett #jacobbethell #JhyeRichardson
pic.twitter.com/DGrHWmtqMo— Charlie (@Shanks63331148) December 24, 2025
मीडिया आणि सोशल मीडियावरील टीकेचा खेळाडूंवर काय परिणाम होतो, याची आपल्याला कल्पना असल्याचेही त्याने नमूद केले. शेवटी स्टोक्स म्हणाला की, “जिंकत असताना सगळं काही छान असतं, पण हरल्यानंतर चित्र पूर्णपणे बदलते. आता या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे.”





