Beed News : बीडमध्ये १०० दिवस पुरेल इतकाच चारा; अपुऱ्या पावसामुळे पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता
Beed News : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे बीड जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

Beed News : अपुऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील ८.५५ लाखांहून अधिक जनावरांसाठी केवळ १०० दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालात नमूद केले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, काही भागांत २५ ते ४९ दिवस पावसाचा खंड पडला आहे; यामुळे जनावरांच्या तसेच पिकांच्या जगण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. (Beed News)
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असला, तरी आष्टी, धारूर, गेवराई, केज, माजलगाव, शिरूर आणि वडवणी या तालुक्यांमध्ये २१ ते ७६ दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. (Beed News)
अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. १२ सप्टेंबरपर्यंत बीड जिल्ह्यातील १६४ सिंचन प्रकल्पांमध्ये १२८.०८ दशलक्ष घनमीटर उपलब्ध पाणीसाठा होता, जे एकूण क्षमतेच्या केवळ १६.६९ टक्के आहे. (Beed News)
बीडमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत ५६६.१ मिमी सरासरी पावसाची अपेक्षा असते, परंतु २० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ३२५.२ मिमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी सोयाबीन (४.०१ लाख हेक्टर), कापूस (२.५० लाख हेक्टर) आणि तूर (४८,६३० हेक्टर) यांसारखी प्रमुख पिके सुकू लागली आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Beed News)
Beed-Pune Railway : बीड-पुणे थेट रेल्वे सेवा सुरू; विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांना मोठा दिलासा
Ramabai Ranveer Beed : लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला





