nagar | महिलांना मारहाण, मुलीवर कोयत्याने वार

राहुरी, (प्रतिनिधी): तुम्ही येथून लाईटचे पोल घेऊ नका, असे म्हणत महिलांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका मुलीवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना वांबोरीत दि. २६ मे रोजी घडली.
शोभा शरद कोकाटे वांबोरी येथील पाचेमहादेव वस्ती येथे राहत असून शेजारीच त्यांचा चुलत दीर गंगाधर बबन कोकाटे हा त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास आहे.
दि. २६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शोभा कोकाटे यांना लाईट घेण्यासाठी पोल रोवण्याचे काम सुरू होते. तेव्हा शोभा कोकाटे व त्यांची मुलगी काम करणाऱ्या लोकांसाठी पाणी घेऊन जात होत्या. तेथे आरोपी आले, तुम्ही येथुन लाईटचे पोल घेऊ नका.
शोभा कोकाटे त्यांना म्हणाल्या की, आम्हाला लाईटची गरज असल्याने आम्ही लाईटचे पोल जोडून घेणार आहे, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी शोभा कोकाटे व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करून जखमी केले.
यावेळी शोभा कोकाटे यांची जाव राजश्री कोकाटे या सोडवासोडव करण्यासाठी आल्या असता त्यांना देखील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहान करून जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर शोभा शरद कोकाटे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी गंगाधर बबन कोकाटे, नवनाथ बबन कोकाटे, परिघाबाई बबन कोकाटे, प्राजक्ता गंगाधर कोकाटे, निकीता नवनाथ कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला





