BCCI Fitness Rules : भारतीय खेळाडूंच्या दुखापतींमुळे बीसीसीआय आक्रमक! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी ‘ही’ टेस्ट अनिवार्य
BCCI Fitness Rules : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या सातत्याने वाढणाऱ्या दुखापतींच्या समस्येवर कठोर पाऊल उचलले आहे.

BCCI Changes Player Fitness Standards Bronco Test Yo Yo Test Center Of Excellence Rules : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या सातत्याने वाढणाऱ्या दुखापतींच्या समस्येवर बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आहे. बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सेलंन्स’ (CoE) मधील वैद्यकीय टीमने खेळाडूंच्या फिटनेस प्रोग्राममध्ये (Fitness Rules) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खेळाडूंसाठी आता फिटनेसचे नियम एकसमान लागू केले जातील, मग तो ज्युनिअर खेळाडू असो वा वरिष्ठ.
यो-यो टेस्टऐवजी ‘ब्रॉन्को टेस्ट’ ठरली मुख्य निकष!
गेल्या वर्षी भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणून एड्रियन लेरुक्स यांची नियुक्ती झाल्यानंतर फिटनेस चाचणीच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले. यापूर्वी खेळाडूंच्या फिटनेससाठी ‘यो-यो टेस्ट’ (Yo-Yo Test) अनिवार्य मानली जायची (ज्यात १६.५ चा स्कोअर आवश्यक होता). परंतु, आता यो-यो टेस्टऐवजी ‘ब्रॉन्को टेस्ट’ (Bronco Test) हा फिटनेसचा मुख्य आधार बनवण्यात आला आहे.
वेळेचे नवे निकष; ५ मिनिटे १५ सेकंदांचे टार्गेट!
🔴 BCCI ENDS SPECIAL TREATMENT FOR TEAM INDIA STARS 🤯
🎙️: Following India’s disappointing UK tour and recurring injury concerns, the BCCI is reportedly revamping Team India’s fitness programme.
As per reports, customised fitness tests will be replaced by standard Bronco and 2K… pic.twitter.com/3IflLE7qPK
— Sam (@cricsam02) August 6, 2026
रिपोर्टनुसार, आता बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने ब्रॉन्को टेस्टसाठी कडक वेळ निश्चित केली आहे. सर्व खेळाडूंना ही टेस्ट ५ मिनिटे १५ सेकंद ते ५ मिनिटे २० सेकंदांच्या आत पूर्ण करावी लागेल. यापूर्वी वरिष्ठ खेळाडूंना ब्रॉन्को टेस्ट पूर्ण करण्यासाठी लवचिकता दिली जायची. तसेच संघ व्यवस्थापनाच्या गरजेनुसार हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या खेळाडूंना तातडीने फिट घोषित केले जायचे. मात्र, आता हा प्रकार पूर्णपणे बंद होणार आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आक्रमक!
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी टीम फिजियो कमलेश जैन यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, खेळाडूची ओळख किंवा वरिष्ठता न बघता केवळ निश्चित केलेल्या फिटनेस मानकांनाच सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. बीसीसीआयच्या या कडक धोरणामुळे भविष्यात खेळाडूंच्या दुखापती कमी होतील आणि पूर्णपणे फिट खेळाडूच संघात स्थान मिळवतील, अशी अपेक्षा आहे.





