BCCI Announcement : बीसीसीआयची मोठी घोषणा ! दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ‘या’ गूढ फिरकीपटूकडे सोपवली निवड समितीची सूत्रं
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची घोषणा (BCCI Announcement) केली असून, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

BCCI Announcement : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची घोषणा (BCCI Announcement) केली असून, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अजित आगरकर यांच्यानंतर सुरुवातीला ओझा यांच्याकडे अंतरिम अध्यक्षपद सोपवण्यात आले होते; मात्र आता त्यांची पूर्णवेळ मुख्य निवडकर्ता म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या पदासाठी भारतीय क्रिकेट (BCCI Announcement) जगतातील अनेक दिग्गज शर्यतीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खेळाडू वसीम जाफर, रमेश पोवार, कॉनर विल्यम्स आणि जेकब मार्टिन यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केले होते. बीसीसीआय मुख्यालयात क्रिकेट सल्लागार समितीने सर्व अर्जदारांची सखोल छाननी करून मुलाखती घेतल्या. अखेर समितीने सर्वानुमते प्रज्ञान ओझा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
याचसोबत माजी फिरकीपटू रमेश पोवार यांचीही निवड समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रज्ञान ओझा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या निवड समितीत आता शिव सुंदर दास, आरपी सिंग, अजय रात्रा आणि रमेश पोवार हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान, प्रज्ञान ओझा यांची कारकीर्द भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अत्यंत रंजक आणि तितकीच गूढ मानली जाते. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळला होता.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या ऐतिहासिक सामन्यात भारताने एक डाव आणि १२६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्या सामन्यात प्रज्ञान ओझाने दोन्ही डावांत प्रत्येकी ५ विकेट्स घेत तब्बल १० बळी टिपले आणि तो ‘सामनावीर’ ठरला.
मात्र, दुर्भाग्याची बाब म्हणजे, सामनावीरचा किताब पटकावूनही ओझाला पुन्हा कधीच भारतीय संघात संधी मिळाली नाही आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अचानक संपली. आज त्याच खेळाडूने भारतीय संघाच्या सर्वोच्च निवडकर्ता पदावर विराजमान होत क्रिकेटच्या वर्तुळात (BCCI Announcement) एक नवा अध्याय लिहिला आहे.






