BCCI AGM Decisions : बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सभेत ऐतिहासिक निर्णयांचा पाऊस! IPL ते पंचापर्यंत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
BCCI AGM Decisions : सभेत बीसीसीआयच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित हिशेबपत्रक आणि २०२६-२७ या वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प एकमुखाने मंजूर करण्यात आला.

BCCI 95th AGM Decisions Arun Dhumal IPL Governing Council Centenary Celebration Umpire Pay Hike : बीसीसीआयची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील मुख्यालयात अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीत नवीन नियुक्त्या, आर्थिक अर्थसंकल्प, आयपीएलचा २० वा हंगाम आणि बीसीसीआयचा शताब्दी सोहळा यांसारख्या अनेक दूरगामी निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेने आयपीएल नियामक परिषदेवर (Governing Council) प्रतिनिधी म्हणून अरुण सिंह धुमल आणि एम. खैरुल जमाल मजुमदार यांची एकमताने निवड केली आहे. हे दोघे आता आयपीएलच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
वार्षिक अर्थसंकल्प मंजूर; २०२७ मध्ये आयपीएलचा २० वा हंगाम गाजणार –
सभेत बीसीसीआयच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित हिशेबपत्रक आणि २०२६-२७ या वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच २०२६-२७ साठी नवीन लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, २०२७ मधील आयपीएलचा २० वा हंगाम ऐतिहासिक व अभूतपूर्व थाटामाटात साजरा करण्याचा संकल्प बैठकीत सोडण्यात आला. क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत लीगचा हा मैलाचा दगड ठरवण्यासाठी बीसीसीआय आतापासूनच भव्य नियोजनात गुंतली आहे.
डिसेंबर २०२७ पासून शताब्दी सोहळ्याची नांदी; वर्षभर चालणार क्रिकेटोत्सव!
Key takeaways from the AGM 📝
🎥 BCCI Honorary Secretary Mr. Devajit Saikia (@lonsaikia) sheds light on the major discussions held during the 95th Annual General Meeting 🙌 pic.twitter.com/Xki706IrEh
— BCCI (@BCCI) September 18, 2026
बीसीसीआयच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यास मंजुरी देण्यात आली. डिसेंबर २०२७ मध्ये सुरू होऊन हा उत्सव २०२८ पर्यंत वर्षभर चालणार आहे. भारतीय क्रिकेटचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडण्यासाठी देशभरात विविध विशेष स्पर्धा, प्रदर्शने आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.
पंच-रेफ्रींच्या मानधनात घसघशीत वाढ; दिव्यांग खेळाडूंनाही मोठा आधार –
मैदानावर न्यायनिवाडा करणाऱ्या अंपायर आणि मॅच रेफरी यांच्या वाढीव वेतन रचनेस तसेच त्यांच्या श्रेणींच्या पुनर्वर्गीकरणास मंजुरी मिळाली. याशिवाय महिला सुरक्षेसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक धोरणाचा आढावा घेणारी नवीन अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली असून अद्ययावत ‘वय पडताळणी धोरण’ लागू केले आहे. तसेच राज्य संघटनांच्या समन्वयाने दिव्यांग क्रिकेटपटूंना आधुनिक सुविधा व साधने पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.





