बारामती: ‘शरद पवार’ यांच्या गोविंद बाग निवासस्थानाची सुरक्षा वाढवली
Updated On:

बारामती – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणीच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनीचे पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी स्थगित केला.
मात्र तो लेखी स्वरुपात करण्यात यावा या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नागेश वनकळशे व त्याचे एक साथीदार शरद पवार यांच्या बारामतीतील
गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी अकरा वाजता खर्डा भाकर आंदोलन करणार होते मात्र आंदोलन करण्यापूर्वीच माळेगांव पोलिसांनी दोन आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले आहे..





