Accident News : ह्रदयद्रावक अपघात; स्कुटी-आयशर टेम्पोच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
Accident News : बारामती तालुक्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे.

Accident News : बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला नऊ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेल्याने दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढली. (Accident News)
या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (17) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (15) या दोन सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (9) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Accident News)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. मृत मुलींचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (Accident News)
दरम्यान, राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच दिवशी आणखी एका दुर्दैवी घटनेत रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवभक्ताचा अपघाती मृत्यू झाला. (Accident News)
सातारा जिल्ह्यातील केंजळेवाडी गावचा कपिल केंजळे हा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना पोलादपूर मार्गावर त्याचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने शिवभक्तांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. (Accident News)





