Baramati Panchayat Samiti : सभापती पदाच्या निवडीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग; ‘हे’ ३ दिग्गज शर्यतीत
Baramati Panchayat Samiti : गटनेतेपदी बाबा चोरमले तर उपगटनेतेपदी नितीन काकडेंची वर्णी; आता सभापती पदावर कोणाचे नाव निश्चित होणार? बारामतीकरांची उत्सुकता शिगेला.

Baramati Panchayat Samiti – बारामती पंचायत समिती सभापतिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड होणार आहे. बारामती पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड सोमवार (दि.९) रोजी होणार आहे.
किरण तावरे, दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार या तिघांच्या नावाची सध्या चर्चा आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता तालुक्याचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यासाबरोबरच अनुभव असलेल्या सदस्याला सभापतीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. किरण तावरे यांनी संजय गांधी निराधार योजना समिती,
राष्ट्रवादीचे तालुका युवकाध्यक्ष या पदांवर काम केले असून त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे यांनी मागील पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. प्रशासकीय आणि पक्षीय कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तर दिग्विजय जगताप यांनी वाणेवाडी गावाच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे.
जितेंद्र पवार हे वडगाव निंबाळकरमधील राजकारणात सक्रिय आहेत. या तिघांपैकी कुणाला संधी मिळणार यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. यापूर्वी पंचायत समिती गटनेतेपदी बाबा चोरमले यांची, तर उपगटनेतेपदी नितीन काकडे यांची निवड करण्यात आली आहे.





