बारामती : वीज कोसळून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

डोर्लेवाडी – बारामती तालुक्‍यातील कुरणेवाडी गावांमध्ये शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (दि.20) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. शेतकरी बाळासाहेब घोरपडे (वय 54) आणि पत्नी संगीता घोरपडे (वय 44), असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत. यात पद्मिमीनी घोरपडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुरणेवाडी परिसरात सगोबावाडीत सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी हे शेतकरी दाम्पत्य शेतात काम करीत होते. त्यावेळी संततधार पाऊस सुरू झाल्याने हे तिघेजण शेतातील झाडाखाली उभे राहिले होते. त्याचवेळी अचानक झाडावर वीज कोसळली.

यात तिघे गंभीर जखमी झाले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या पद्मिमीनी घोरपडे यांच्यावर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.