बारामती: दिवसभरात 129 जणांना कोरोनाची बाधा
Updated On:

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात रविवारी दिवसभरात 129 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. आठ महिन्यातील दिवसभरातील हा उच्चांकी आकडा आहे. बारमती शहर व तालुक्यातील 119 जणांच्या अहवाला पैकी शहरातील 18 व तालुक्यातील चार असे 22 व इतर तालुक्यातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत. 92 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
तसेच शासकीय एंटीजेन नमुने 55 घेतले होते. त्यापैकी 18 पॉझिटिव्ह तर 37 निगेटिव आले आहेत. तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेल्या 16 नमुन्यांपैकीपैकी 5 पॉझिटिव्ह आले तर 11 निगेटिव आले आहेत. दिवसभरात 129 रुग्ण पॉझिटिव्ह आली असून एकूण रुग्ण संख्या 1417 एवढी झाली आहे. बारामती एकूण 48मृत्यू आत्तापर्यंत झालेले आहेत. 633 रुग्ण बरे झाले आहेत.





