मोठी बातमी..! बारामतीत राजकीय ट्विस्ट! सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Baramati Assembly Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे.

Baramati Assembly Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत नवा वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस त्या जागेवर उमेदवार उभा करेल, असा मोठा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर राष्ट्रवादी निवडणूक लढणार नसेल, तर काँग्रेसला उमेदवार देण्याचा विचार करावा लागेल.” त्यांनी यापूर्वीही ‘पवार विरुद्ध पवार’ लढती झाल्याची आठवण करून देत ही जागा केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या घडामोडींमुळे बारामतीत तिहेरी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेवर पाठवावे आणि विधानसभा निवडणुकीत वेगळा उमेदवार द्यावा, असे मत व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी रंगत निर्माण झाली आहे.




