Baramati by-election : बारामतीत ‘बिनविरोध’ची चर्चा फिस्कटणार? लक्ष्मण हाके निवडणुकीच्या मैदानात उतरणार; राजकीय समीकरणे बदलणार
Baramati by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Baramati by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरू असतानाच आता या राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. बारामतीतील कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याचा मोठा आग्रह होत असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना हाके म्हणाले की, लवकरच बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांसोबत व्यापक चर्चा केली जाईल. त्या बैठकीनंतर निवडणूक लढवायची की नाही आणि उमेदवार कोण असणार याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. Baramati by-election
दरम्यान, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीवर भाष्य करताना हाके यांनी सरकारवर टीका केली. दादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी शपथविधी होतो, मग त्यांच्या निधनाचे दुःख आम्हीच का व्यक्त करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. Baramati by-election

Laxman Hakes
हाके यांनी पुढे सांगितले की, ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून ते वसतिगृहाच्या प्रश्नांपर्यंत अनेक मागण्यांसाठी आम्ही संघर्ष केला, मात्र त्याला न्याय मिळाला नाही. तसेच बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेले अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बदलण्याच्या निर्णयालाही त्यांनी विरोध दर्शवला.
लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे योग्य नाही. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी निवडणूक लढवणे हाच एक पर्याय असल्याचेही हाके यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार सुप्रिया सुळे जर व्यावसायिक पद्धतीने राजकारण करत असतील तर आम्हीही तसेच राजकारण करू, असेही त्यांनी म्हटले. Baramati by-election
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम Baramati by-election
अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 9 एप्रिल 2026
मतदान : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : 6 मे 2026
या पार्श्वभूमीवर बारामती पोटनिवडणुकीत नेमकी कोणती राजकीय समीकरणे तयार होतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.





