मिशेल अन् बराक ओबामा होणार वेगळे? ; घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Barack Obama-Michelle Divorce Rumours । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांच्यातील सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागल्याचे म्हटले जात आहे. कारण सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जेनिफर यांच्यातील नात्यांवरून या चर्चांना उधाण आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चांमुले बाराक आणि मिशेल ओबामा दोघांना एकमेकांशी जुळवून घेणे कठीण होत चालले आहे. सोशल मीडियावरील या अफवांनंतर, मिशेल ओबामा यांनीही महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास नकार दिला.
‘इनटच मॅगझिन’ ने बराक आणि जेनिफरच्या केमिस्ट्रीवर एक कव्हर स्टोरी लिहिली. रडार ऑनलाइनच्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत ओबामा दाम्पत्यातील नाते दुरावले आहे. या अफवांमुळे, मिशेल ओबामा यांनी २० जानेवारी २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभालाही हजेरी लावली नाही. तथापि, इंटरनेटवर असेही म्हटले जात होते की मिशेलला ट्रम्पचा विजय आवडला नाही.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, ‘कुटुंब ‘कठीण काळातून’ जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविकता अशी आहे की ते सध्या मित्रांसारखे आहेत. त्यांच्या नात्यातील चमक कमी झाली आहे.” असे म्हटले गेले आहे.
ओबामा -जेनिफर यांची पहिली भेट २००७ मध्ये झाली Barack Obama-Michelle Divorce Rumours ।
गेल्या काही वर्षांत दोघांचे सार्वजनिक दर्शन कमी झाले आहे, यावरून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसून येते. अनेक अहवालांमध्ये बराक आणि जेनिफर यांच्यात काही केमिस्ट्री असल्याचे पुष्टी होते. तर, जेनिफरने या अफवांना नकार दिला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिमी किमेल शोमध्ये तिला या अफवांबद्दल विचारण्यात आले होते आणि तिने उत्तर दिले होते, “मी त्यांना (ओबामा) एकदा भेटले आहे. मी मिशेलला त्यांच्यापेक्षा जास्त ओळखते.” रिपोर्ट्सनुसार, जेनिफर आणि बराक २००७ मध्ये हॉलिवूडच्या एका कार्यक्रमात भेटले होते.
ओबामांनी मिशेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या Barack Obama-Michelle Divorce Rumours ।
दरम्यान , बाराक ओबामा कुटुंब कठीण काळातून जात आहे. ओबामा यांनी मिशेलला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आणि तिला ‘त्यांच्या आयुष्यातील प्रेम’ असे संबोधून या सर्व अफवा फेटाळून लावल्या. १७ जानेवारी रोजी ओबामा यांनी मिशेलचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “माझ्या आयुष्यातील प्रेम मिशेल ओबामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू प्रत्येक भाग चोखंदळपणे, विनोद आणि कृपेने भरतेस – आणि तू ते करताना छान दिसतेस.” . मी खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासोबत आयुष्यातील साहसांचा अनुभव घेता आला. तुम्हाला खूप प्रेम आहे!”असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते . त्यांच्या या संदेशावरून दोघांमधील प्रेम अजूनही कायम असून त्यांच्या घटस्फोटाच्या केवळ वावड्या उठत असल्याचे दिसून येत आहे.





