Pune News : एक रुपयांत घराघरात बाप्पाचे आगमन; युवक काँग्रेसचा उपक्रम

पुणे : महागाईच्या काळात घरात उत्सव साजरा करणे सामान्य माणसाला अशक्य झाले आहे, तो आनंद द्विगुणीत करण्यासाठी “ज्यांना महागड्या मूर्ती परवडत नाहीत. त्यांच्या घरातसुद्धा बाप्पा आनंदाने यावेत या उदात्त उद्देशाने युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेली सलग तीन वर्षे फक्त १ रुपयात गणेश मूर्ती वाटप कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल सुरेश काळे यांच्या पुढाकारातून आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
बुधवारी (दि. २७ ऑगस्ट) सकाळी नवी पेठेतील गांजवे चौक, अष्टविनायक मित्र मंडळाशेजारी हा कार्यक्रम पार पडला. आतापर्यंत ४५० हून अधिक कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून, सामाजिक जबाबदारीची भावना व श्रद्धेचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम पुणेकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितीने नागरिकांना प्रोत्साहित करणारे मान्यवर
•मोहन दादा जोशी – उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
•गोपाळ दादा तिवारी – प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
•चेतन आगरवाल – अध्यक्ष, पुणे शहर व जिल्हा इंटक
•अनंत रामचंद्र घरत – प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर
•डॉ. मदन कोठुळे – अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) क्रीडा सेल, पुणे शहर
•मा. सौरभदादा अमराळे – अध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस
•सागर धाडवे – सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस
•हेमंत राजभोज – अध्यक्ष, नेहरू स्टेडियम ब्लॉक कमेटी
•अक्षय माने – अध्यक्ष, कसबा ब्लॉक कमेटी
•सोनिया ओव्हल – सरचिटणीस, महिला काँग्रेस पुणे शहर
•प्रवीण नाना करपे – माजी अध्यक्ष, कसबा ब्लॉक कमेटी
•गोरक पळसकर – सरचिटणीस, पुणे शहर काँग्रेस कमेटी
•राजू नाणेकर – शिवसेना (शिंदे गट)
•निलेश वैराट – अध्यक्ष, समाज विकास मित्र मंडळ
मोहन शेडगे संचालक – Firuya.com यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य नेहमी असते. त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व आनंदाचे हसू हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे मत आयोजक कुणाल काळे यांनी व्यक्त केले.





