बांग्लादेशी मुलीला मैत्रिणीने बुधवार पेठेत 5 लाख रुपयांना विकले, अखेर कोठेवालीच्या अत्याचारातून ‘अशी’ झाली सुटका

पुणे – बांग्लादेशची सीमा बेकायदा ओलांडून मैत्रिणीबरोबर आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पुण्यात मोठी आपबीती ओढवली. या मुलीला मैत्रीणीनेच तीन लाख रुपयांना बुधवार पेठेतील एका कोठेवालीला विकले. यानंतर कोठेवालीने ‘तु बांग्लादेशी असल्याचे पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करेल’ अशी धमकी देत तीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. पाच महिण्यात झालेल्या अत्याचाराला वैतागून तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करत पोलीस ठाणे गाठले. तीने दिलेल्या तक्रारीनूसार पाच महिलांवर गुन्हे दाखल झाले असून एका महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत मुलगी १६ वर्षे दोन महिण्यांची आहे. तीला बांग्लादेशातून मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवत पुण्यात आणले. यासाठी त्यांना बांग्लादेशातून नदीमार्गे बेकायदा भारतीची सीमा ओलांडली. पुण्यात आल्यावर त्या भोसरीमध्ये सात ते आठ दिवस राहिल्या. यानंतर तीच्या मैत्रिणीने तीला बुधवार पेठेत आणले. तीथे तीला एका महिलेला पाच लाखाच विकले.
यानंतर महिलेने तीला तुळशीबाग आणि बुधवार पेठेतील कोठ्यात ठेवले. तीला पोलिसांत देण्याची धमकी देत वेश्याव्यवसाय करण्यात भाग पाडले. पिडीतेला अत्याचार सहन होत नव्हते. मात्र तीला खोलीतून बाहेर पडू दिले जात नव्हते. पाच महिणे अत्याचार सहन केल्यावर तीने एकदा सुटकेचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. मात्र ती सात एप्रिलला कशीबशी खोलीतून बाहेर पडली.
तीने बस, रिक्षा पकडत हडपसर गाठले. तेथे हडपसर पोलीस ठाण्याची माहिती मिळताच तेथे धाव घेत तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल करत एका महिलेला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.





