बांगलादेशात संपूर्ण संचारबंदी लागू ! हिंसाचाराच्या आगीत 105 जणांचा बळी, पंतप्रधानांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Bangladesh Protests । बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस हिंसक होत आहे. आतापर्यंत या आंदोलनात 105 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा आणि लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेख हसीनाचे प्रेस सेक्रेटरी नईमुल इस्लाम खान यांनी काल एका वृत्तसंस्थेला, “कर्फ्यूबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल” अशी माहिती दिली होती. तर दुसरीकडे, बांगलादेशी मीडियानुसार, शुक्रवारी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांवर कारवाई केली, ज्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
ढाक्यात अनेक घरांना आग लागली Bangladesh Protests ।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पोलिसांनी काही भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, “राजधानी ढाकामध्ये अनेक ठिकाणी छतावरून ज्वाला उठताना दिसत आहेत आणि अनेक ठिकाणी धूर आकाशात उठताना दिसत आहे. या आंदोलनामुळे दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली आहे. अनेक वृत्तवाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत.”
मृतांची संख्येत सातत्याने वाढ Bangladesh Protests ।
बंगाली वृत्तपत्र प्रथम आलोने वृत्त दिले आहे की, आंदोलकांनी रस्ते रोखल्याने आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर दगडफेक फेकल्यामुळे देशभरात रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली आहे. बांगलादेशातील 64 पैकी 47 जिल्ह्यांमध्ये गुरुवारी झालेल्या हिंसाचारात 27 जणांचा मृत्यू झाला आणि 1,500 जण जखमी झाले. रुग्णालयांचा हवाला देत, एएफपीने स्वतंत्रपणे सांगितले की शुक्रवारी रात्रीच्या निदर्शनांमध्ये एकूण मृत्यूची संख्या 105 वर पोहोचली आहे. मात्र, पोलिसांनी मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही.
हा बांगलादेशचा अंतर्गत मुद्दा – भारताची भूमिका
या सर्व परिस्थितीवर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ही अशांतता बांगलादेशचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. जर भारतीयांचा विचार केला तर ते सर्व १५,००० भारतीय बांगलादेशमध्ये सुरक्षित आहेत. बांगलादेशात शिकणारे भारतीय रस्त्याने परतत आहेत.असे भारताने म्हटले आहे.
परिस्थिती खूपच अस्थिर – अमेरिकन दूतावास
या निदर्शनादरम्यान, ढाका येथील अमेरिकन दूतावासाने सांगितले की, बांगलादेशात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो जखमी झाले आहेत. ढाकामध्ये निदर्शने पसरत आहेत आणि हिंसक चकमकी होत आहेत. परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे.
युरोपियन युनियनकडून जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल चिंता व्यक्त
आंतरराष्ट्रीय हक्क गटांनी सेवा निलंबन आणि सुरक्षा दलांच्या कृतींवर टीका केली आहे. हिंसाचार आणि जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे युरोपियन युनियनने म्हटले आहे. “कायद्याचे राज्य आणि लोकशाही स्वातंत्र्यावर आधारित, पुढील हिंसाचार रोखणे आणि शक्य तितक्या लवकर परिस्थितीवर शांततापूर्ण तोडगा काढणे महत्वाचे आहे,” EU ने म्हटले आहे.





