Shirin Sharmin Chaudhury : बांगलादेशच्या माजी सभापती शरीन शर्मिन चौधरी यांना अटक
शरीन शर्मिन चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) असे या माजी सभापती महिलेचे नाव असून त्यांना ढाका मेट्रोपोलिटन पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रॅंचने अटक केली आहे.

Shirin Sharmin Chaudhury : बांगलादेशात प्रथमच संसदेच्या माजी सभापती महिलेला अटक करण्यात आली आहे. शरीन शर्मिन चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) असे या माजी सभापती महिलेचे नाव असून त्यांना ढाका मेट्रोपोलिटन पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रॅंचने अटक केली आहे.
बांगलादेशातल्या जनआंदोलनाच्या काळात झालेल्या हिंसाचार आणि तोडफोडीप्रकरणी लालबाग पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) या वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होत्या. अलिकडेच त्या धनमोंडी येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी रहात होत्या.
तेथूनच त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात ढाक्यातील बनानी आणि उत्तरा पोलीस स्थानकात, तसेच रंगपूर येथेही गुन्हे दाखल झाले आहेत. चौधरी यांची चौकशी केली जात असल्याचे ढाका पोलिसांचे उपायुक्त एम.एन. नासिर उद्दिन यांनी सांगितले.
चौधरी (Shirin Sharmin Chaudhury) या बांलादेशच्या जातिया संगसदच्या पहिल्या महिला सभापती होत्या. त्या एप्रिल २०१३ पासून सप्टेंबर २०२४ पर्यंत सभापती होत्या. रंगपूर-६ मतदारसंघातून त्या संसदेवर निवडून गेल्या होत्या.
जनआंदोलनानंतर अटकेच्या भीतीने आवामी लीगचे बहुतेक नेते, मंत्री आणि खासदार भूमिगत झाले होते. त्यांच्याबरोबर चौधरीही फरार झाल्या होत्या. संसद विसर्जित झाल्यानंतरही सभापती कायम राहतात. पण नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर चौधरी सत्ता स्थापनेच्यावेळी त्यांनी राजीनामा दिला.






