Nayeem Hasan Assaulted : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला पोलिसांकडून बेदम मारहाण अन् शिवीगाळ; धक्कादायक प्रकाराने क्रीडा जगतात खळबळ
Nayeem Hasan Assaulted : पोलिसांची दादागिरी! राष्ट्रीय खेळाडूला भररस्त्यात शिवीगाळ केल्याने बीसीबी संतप्त; पोलीस आयुक्तांनी रात्रीच घेतला मोठा निर्णय

Nayeem Hasan Assaulted By Police Chattogram : बांगलादेश क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बांगलादेशच्या म १२ जून रोजी ढाका येथे लिस्ट ए स्पर्धा संपवून रात्री उशिरा घरी परतत असताना नयीमसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. (Nayeem Hasan Assaulted)
“मी देशासाठी खेळतो सांगितलं, तरी ऐकलं नाही!” (Nayeem Hasan Assaulted)
झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी बांगलादेशच्या संघात निवड झालेल्या या खेळाडूवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पत्रकारांशी बोलताना नयीमने त्या रात्रीचा थरार सांगितला. तो म्हणाला, “विमानाला विलंब झाल्याने मी विमानतळावरून गाडीने घरी येत होतो. रात्री ११:२५ च्या सुमारास पोलिसांनी लंकन बाजार उड्डाणपुलाखाली माझी गाडी थांबवली.”
तो पुढे म्हणाला, “मी त्यांना सहकार्य करत बॅग तपासण्यास सांगितले, पण त्यांनी अचानक माझा गळा पकडला आणि बळजबरीने त्यांच्या गाडीत कोंडले. मी विरोध केला असता त्यांनी मला बाहेर ढकलून बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली. मी एक राष्ट्रीय क्रिकेटपटू असून देशासाठी कसोटी खेळतो, असे वारंवार सांगूनही त्यांनी काहीच ऐकले नाही. शेवटी वरिष्ठांचे फोन आल्यावरच त्यांचा सूर बदलला.” (Nayeem Hasan Assaulted)
🗣️ Nayeem Hasan’s full statement on the incident 🇧🇩
“I was returning after playing a DPL match. Our flight arrived at 10:20 PM. At that time, we couldn’t find any car, so I was going by CNG.
At the toll area, a traffic police officer stopped us. Then someone said to check our… pic.twitter.com/u3CA6sYGN9
— Shadman Sakib Arnob (@arnuX05) June 13, 2026
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा तीव्र निषेध; तपासाचे आदेश! (Nayeem Hasan Assaulted)
ডিবি পরিচয়ে জাতীয় দলের ক্রিকেটার নাঈমকে মা/রধর ও হেনস্থার অভিযোগ pic.twitter.com/U2ns6gh4OJ
— Monju Alom (@MonjuAlom1) June 13, 2026
या संतापजनक घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) तीव्र चिंता व्यक्त करत या अनुचित वर्तनाचा जाहीर निषेध केला आहे. बोर्डाने म्हटले की, “एका राष्ट्रीय खेळाडूशी असे अमानुष वर्तन होणे अत्यंत खेदजनक असून हे प्रकरण आम्ही अत्यंत गांभीर्याने घेत आहोत.” दुसरीकडे, चट्टोग्राम पोलिसांचे उप आयुक्त अमीरुल इस्लाम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नयीमला पूर्ण न्याय मिळेल, असे आश्वासन दिले आहे. (Nayeem Hasan Assaulted)
२६ वर्षीय नयीम हसन हा बांगलादेशचा अव्वल फिरकीपटू असून त्याने १४ कसोटी सामन्यांत ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७५ सामन्यांत ३०० विकेट्स, ८९ लिस्ट ए सामन्यांत १११ आणि ६९ टी-२० सामन्यांत ५७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. इतक्या बड्या खेळाडूला झालेल्या मारहाणीमुळे पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Nayeem Hasan Assaulted)





