Shreyas Iyer Apartment : कॅप्टन बनताच श्रेयसने मुंबईच्या सर्वात महागड्या भागात घेतलं आलिशान अपार्टमेंट; भाडं ऐकून चक्रावून जाल
Shreyas Iyer Apartment : श्रेयस अय्यरने मुंबईतील अतिशय पॉश आणि सर्वात महागडा निवासी परिसर मानल्या जाणाऱ्या वरळी (Worli) भागात ३ वर्षांसाठी एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.

Shreyas Iyer Rents Luxury Apartment Worli Mumbai Rent Price : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि नवनियुक्त टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या मैदानावरील नव्या एन्ट्रीसह आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरने मुंबईतील अतिशय पॉश आणि सर्वात महागडा निवासी परिसर मानल्या जाणाऱ्या वरळी (Worli) भागात ३ वर्षांसाठी एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. ‘स्क्वेअरयार्ड्स’ (SquareYards) द्वारे मिळालेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटसाठी श्रेयस अय्यर तब्बल ७.१४ कोटी रुपये एकूण भाडे मोजणार आहे. (Shreyas Iyer Apartment)
फ्लॅटचे भाडे दरमहा २१ लाखांवर; ४ कार पार्किंग – (Shreyas Iyer Apartment)
हा आलिशान फ्लॅट वरळी (Worali) येथील नामांकित ‘आर्टेशिया’ (Artesia) या सोसायटीमध्ये असून तो सुमारे ३,८७५ चौरस फूट (Sq Ft) क्षेत्रफळात पसरलेला आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटसोबत त्याला ४ कार पार्किंगची जागाही मिळाली आहे. १० जून २०२६ रोजी या कराराची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, यासाठी १.८४ लाख रुपयांची मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरण्यात आली आहे.
३६ महिन्यांच्या (३ वर्षे) या लीज करारातील भाड्याचे गणित थक्क करणारे आहे. पहिल्या वर्षी श्रेयस दरमहा १८.५० लाख रुपये भाडे देईल. दुसऱ्या वर्षी त्यात ७ टक्क्यांची वाढ होऊन ते १९.७९ लाख रुपये होईल, तर तिसऱ्या वर्षी हे भाडे २१.१८ लाख रुपये प्रतिमहिना या सर्वोच्च आकड्यावर पोहोचेल. (Shreyas Iyer Apartment)
🚨 SHREYAS IYER RENTS ₹7.14 CRORE LUXURY APARTMENT IN MUMBAI 👀
Shreyas Iyer has reportedly leased a 3,875 sq ft apartment at Artesia in Worli for three years.
• Total rent: ₹7.14 crore
• Monthly rent starts at ₹18.5 lakh
• Four car parking spaces
• Rent rises by around… pic.twitter.com/oQg01V3UX4— TheWicketReport (@WicketReport) June 12, 2026
वरळीत कोट्यवधींची गुंतवणूक – (Shreyas Iyer Apartment)
श्रेयस अय्यरचे वरळीवरील प्रेम नवीन नाही. काही काळापूर्वीच त्याने याच भागात २.९ कोटी रुपयांची एक कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली होती. वरळी सी-फेस, लक्झरी टॉवर्स आणि नरिमन पॉईंट किंवा बीकेसी सारख्या बिझनेस हबशी असलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे हा परिसर स्टार्सची पहिली पसंती बनला आहे.
याच भागात नुकताच गोदरेज ग्रुपच्या तान्या दुबाश यांनी तब्बल ३०० कोटी रुपयांना एक सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी करून रिअल इस्टेट बाजारात खळबळ उडवून दिली होती. या भागात सध्या प्रीमियम घरांचे दर ८० हजार ते १ लाख रुपये प्रति चौरस फूट असून, एक्सक्लूसिव्ह प्रॉपर्टीजचे दर २.८० लाख रुपये प्रति चौरस फुटांपेक्षाही जास्त आहेत.





