IND vs BAN – भारतीय संघ नुकताच न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळून आला आहे. टीम इंडियाने टी-२० मालिकेत बाजी मारली मात्र एकदिवसीय मालिकेत यजमानांनी मात दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आता बांगलादेशविरुद्धच्या दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
दरम्यान, संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुःखापत झाल्याने युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला मालिकेसाठी निवडले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका ( IND vs BAN ) ४ डिसेंबर रविवारपासून सुरू होणार आहे. शमीला दुखापत झाल्याने शेवटच्या क्षणी उमरान मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. उमरानने नुकतेच न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करताना ३ बळीही घेतले होते.
#DuteeChand | अॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरशी खरंच लग्न केलंय? जाणून घेऊया सत्य!
ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजीची क्षमता
उमरान मलिककडे ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून पहिले जात आहे. अशा परिस्थितीत त्याला बांगलादेश दौऱ्यावरही छाप सोडण्याची संधी असणार आहे. मात्र वरिष्ठ खेळाडुंच्या उपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर कितपत विश्वास टाकेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
🚨 NEWS 🚨: Umran Malik to replace Mohd. Shami in India’s ODI squad for Bangladesh series. #TeamIndia | #BANvIND
Details 🔽https://t.co/PsDfHmkiJs
— BCCI (@BCCI) December 3, 2022
उमरानकडे २०२३ विश्वचषकासाठी दावेदारीची संधी
आयपीएलच्या मागील हंगामात हैदराबाद संघाकडून खेळताना उमरान मलिकने ताशी १५० किमी वेगापेक्षाही जास्त गतीने गोलंदाजी केलेली आहे. सध्या उमरान मलिक युवा खेळाडू असल्याने त्याला कठीण सामन्यांमध्ये जास्त संधी दिली जात नाही. मात्र, २०२३ साली भारतातच होणारा एकदिवसीय विश्वचषक पाहता उमरानकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला नेहमीच वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवली आहे. त्यामुळे संघासाठी पर्याय उपलब्ध असावा म्हणून उमरान मलिककडे लक्ष असणार आहे.