Balika Vadhu : ‘बालिका वधू’ फेम अभिनेता ७ वर्षानंतर छोट्या पडद्यावर करणार कमबॅक
Balika Vadhu : शशांक एका सुपरनॅच्युरल थ्रिलर मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Balika Vadhu : छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील सर्व कलाकरांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेतील तरुणपणीच्या जगदीशची भूमिका अभिनेता शशांक व्यास याने साकारली होती. या मालिकेमुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली.
त्यानंतर गेल्या काही काळापासून तो टीव्ही विश्वापासून दूर गेला होता. मात्र आता ७ वर्षानंतर त्याने पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शशांक एका सुपरनॅच्युरल थ्रिलर मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत तो एका नव्या अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Balika Vadhu
एका मुलाखतीत शशांकने टीव्ही विश्वापासून दूर राहण्याबाबत सांगितले होते की, “जर मी एका ठिकाणीच थांबलो असतो, तर मला स्वतःला पुढे नेण्याची संधी मिळाली नसती. कम्फर्ट झोनमध्ये राहणे हे कलाकारासाठी सर्वात मोठी चूक असते. ‘बालिका वधू’ सारख्या शोने मला ओळख मिळवून दिली, पण एक व्यक्ती म्हणून मला काहीतरी नवीन करायचे होते.”
शशांक व्यासला शेवटचे 2019 मध्ये ‘रूप -मर्द का नया स्वरूप’ या शोमध्ये दिसला होता. मात्र, तो शो संपल्यानंतर टीव्हीच्या झगमगाटापासून दूर गेला. या काळात त्यांनी स्वतःला वेब सिरीज आणि वेगळ्या प्रकारच्या सिनेमासाठी तयार केले. अलीकडेच तो वरुण धवन आणि सामंथा यांच्या चर्चेत असलेल्या वेब सिरीज ‘सिटाडेल: हनी बनी’मध्येही दिसला. Balika Vadhu :






