Rashmika Vijay: विजय देवरकोंडा–रश्मिका मंदाना यांच्या शाही लग्नाची चर्चा; हैदराबादमध्ये होणार भव्य रिसेप्शन?
उदयपूरमध्ये (Rashmika Vijay) लग्नानंतर मार्च महिन्यात हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल, अशीही चर्चा आहे. 4 मार्च रोजी मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो. या रिसेप्शनला साऊथ इंडस्ट्रीतील मोठे कलाकार तसेच बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहू शकतात.

Rashmika Vijay: साऊथ सिनेमातील चर्चेत असलेली जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
ताज्या रिपोर्टनुसार दोघे 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, लग्न समारंभ अत्यंत खासगी स्वरूपात होणार असून त्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. उदयपूरमधील एका आलिशान महालात साध्या पण रॉयल थीममध्ये सजावट केली जाणार असल्याचे सांगितले जाते. समारंभ पूर्णपणे खाजगी ठेवण्याची तयारी सुरू आहे.
उदयपूरमध्ये लग्नानंतर मार्च महिन्यात हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल, अशीही चर्चा आहे. 4 मार्च रोजी मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो. या रिसेप्शनला साऊथ इंडस्ट्रीतील मोठे कलाकार तसेच बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहू शकतात.
असेही म्हटले जात आहे की, दोघांनी ऑक्टोबर 2025 मध्ये गुपचूप साखरपुडा केला होता. मात्र या बातमीवरही दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने लग्नाचे विशेष प्रक्षेपण हक्क मिळवण्यासाठी 60 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता, पण तो त्यांनी नाकारल्याचे सांगितले जाते. हा खास क्षण खासगीच ठेवण्याचा त्यांचा निर्णय असल्याची चर्चा आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, विजय अलीकडेच ‘किंगडम’ या चित्रपटात दिसला होता, तर रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता चाहत्यांना उत्सुकता आहे की या चर्चांना अधिकृत शिक्कामोर्तब मिळते की या केवळ अफवा ठरतात.






